आयपीएलमध्ये पंचांना ३ लाख ४६ हजार रुपये मानधन   

मुंबई : आयपीएलमध्ये खेळाडूंसोबतच पंचांचीही भूमिका महत्त्वाची असते. पंचांचा एक निर्णय सामन्याचा निकाल बदलू शकतो. आयपीएलचा थरार पुन्हा एकदा रंगणार आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामाचा पहिला सामना २२ मार्चला खेळवण्यात येईल. आयपीएलच्या या हंगामाआधी खेळाडूंचा लिलाव झाला होता. लिलावात खेळाडूंवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला.क्रिकेटमध्ये खेळाडू इतकेच पंचही महत्त्वाचे असतात. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना भरपूर पैसे मिळतात, पण पंचांना किती पैसे मिळतात? आयपीएलमध्ये खेळाडूंसोबतच पंचांचीही भूमिका महत्त्वाची असते. पंचांचा एक निर्णय सामन्याचा निकाल बदलू शकतो. खेळाडूंना खेळण्यासाठी त्यांच्या फ्रँचायझीकडून शुल्क दिले जाते, तर पंच बीसीसीआयकडून असतात. बीसीसीआयकडून पंचांना पगार दिला जातो.
 
आयपीएलमध्ये ग्रुप राउंडचे सामने असतात. यानंतर प्लेऑफ खेळवले जातात. शेवटी, अंतिम सामना होतो. मैदानावर असलेल्या पंचांना, लीग सामन्यासाठी पंचांना जवळपास ३ लाख ४६ हजार रुपये मिळतात. त्यांना अंदाजे ५ लाख २० हजार रुपये दिले जातात. आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पंचांना ८ हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ६ लाख ९४ हजार रुपये मिळतात.

Related Articles